सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूरात इंटरनेट सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूरातही आज शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, केएमटी, वडाप, रिक्षा, दूध संस्था हे बंद राहणार आहे. यासह सरकारच्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव आज पहाटेपासून विविध मोबाईल कंपन्यांनी इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. 

मोबाईल कंपन्यांकडून सरकारने दिलेल्या आदेशानुसार मोबाईलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही सेवा तात्पुर्ती ठरावीक कालावधीसाठी खंडीत करण्यात आली आहे. सरकारचे निर्देश आल्यानंतर पुन्हा ही सेवा पूर्ववत करण्यात येईल असे मोबाईल कपन्यांकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: Internet service shut down in Kolhapur