राष्ट्रवादी इच्छूकांच्या मुलाखती जल्लोषात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सांगली : ढोल-ताशांच्या निनादात, गाड्याभरुन आणलेल्या  समर्थकांच्या अलोट उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकरा प्रभागातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. साहेबांच्या वाढदिवशी फळे वाटली, सामाजिक उपक्रम राबवले, प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी रात्री अपरात्रीही जातो, पक्षासाठी निष्ठेने काम केले आता उमेदवारी हवी असा  आग्रह करत सर्व इच्छूकांनी नेत्यांसमोर आपली बाजू रेटून मांडली.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी आज मिरज रोडवरील वसंत कॉलनीतील आरआयटी संस्थेच्या इमारतीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती सुरु 
आहेत. रविवार सुटीची संधी साधून इच्छूक उमेदवारांनी आपले शक्तीप्रदर्शन 
करण्यासाठी समर्थकांच्या जल्लोषात मुलाखती दिल्या.  वसंत कॉलनीत महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यालय सुरु केले  आहे. तेथे आज सकाळपासूनच मुलाखती सुरु झाल्या. मुलाखतींसाठी इच्छूक  उमेदवार रिक्षा, ट्रॅक्‍स, छोटा हत्ती टेम्पोतून समर्थकांना घेऊन वाजतगाजत मुलाखतींसाठी येत होते.

वाद्यांच्या गजरात आणि पुंगळ्या काढून  मोठ्या आवाजात दुचाकींच्या वेगाने शहरात जल्लोषी वातावरण झाले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, राहूल
पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक यांनी इच्छूकांची मते जाणून
 घेतली. उमेदवारांनी प्रभागातील आपल्या कामांचा, संपर्काचा आढवा नेत्यांसमोर मांडून आपल्यालाच उमेदवारी देण्यासाठी आग्रही मागणी केली.  त्यांचे समर्थकही आपल्या उमेदवाराची बाजू मांडत होते.

आज शहरातील 11 प्रभागातील मुलाखती घेतल्या. इच्छूकांची संख्या मोठी आहे.
युवकांबरोबरच महिलांचाही मोठा उत्साह दिसून आला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसने यावर लवकर तोडगा काढावा अशी आमची इच्छा आहे. आघाडीबाबत आमची आज सायंकाळी बैठक होणार आहे.
संजय बजाज, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष

Web Title: interview of NCP candidates