तत्कालीन वनक्षेत्रपाल जेरेंची कसून चौकशी

तत्कालीन वनक्षेत्रपाल जेरेंची कसून चौकशी

कोल्हापूर - मौजे मोसम व घुंगूर (ता. शाहूवाडी) येथे अपहार करणाऱ्या विनायक पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. वनसंरक्षक अमृता कांबळे हिला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पुईखडी येथील तिच्या घरी पोलिस चौकशीसाठी गेले होते, मात्र ती घरी नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तिने आपला मोबाईलही बंद ठेवला आहे.

दरम्यान, आज रोपवाटिका अपहारप्रकरणी तत्कालीन वनक्षेत्रपाल अनिल जेरे यांची मलकापूर पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी कसून चौकशी केली. जेरे यांच्याकडे चौकशीसाठी आवश्‍यक कागदपत्रे नसल्याने त्यांची बुधवारी (ता. १३) पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचे श्री रानमाळे यांनी सांगितले. 

घुंगूर आणि मोसम येथे संयुक्त वनसमितीत २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विनायक पाटील याला अटक केली आहे, तर याच आरोपाखाली सहआरोपी अमृता कांबळेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

दरम्यान, वनक्षेत्रापाल अनिल जेरे यांची आज दुपारी चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये आवश्‍यक कागदपत्रांची माहिती घेण्यात आली. या सर्वांनी २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा निधी आपल्या संबंधितांच्या नावे वर्ग केला आहे. या नातेवाइकांना याची कल्पनाही नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, जे काम केले नाही, त्या कामाचा मोबदला घेतला म्हणून त्यांच्यावरही कारवाई होते, अशी परिस्थिती आहे. जे काम झाले नाही, ते काम माझ्यासमोरच झाल्याचा शेरा मारून वनसंरक्षक अमृता कांबळे यांनी हा निधी मंजूर केला. याला वनक्षेत्रपाल अनिल जेरे यांनीही सहमती दिल्याने हा निधी काम न करणाऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. 

मलकापूर पोलिसांकडून याची कसून चौकशी केली जात आहे. विनायक पाटील याच्यावर कारवाई झाल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला आहे. 

वनक्षेत्रपालांकडून अहवाल आल्यानंतर तो अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल. त्यानंतर विनायक पाटील याला बडतर्फ करायचे की इतर कारवाई करायची हा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील. हा अधिकार वरिष्ठांना आहे. 
- हनुमंत धुमाळ, 

  उपवनसंरक्षक, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com