भोपाळमधील कंपनीच्या सातजणांवर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी गुन्हा

भोपाळमधील कंपनीच्या सातजणांवर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी गुन्हा

सांगली -  भोपाळ येथील निर्मल इन्फ्राहोम कॉर्पोरेशन लिमिटेड या अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तब्बल १४ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालकांसह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अभिषेक एस. चौहान (रा. कालापिपाला, मध्य प्रदेश), संचालक हरेश शर्मा, तुलसिंग चौधरी (दोघे रा. त्रिकोडिया, मध्य प्रदेश), निरंजन कससेना (रा. भोपाळ, मध्य प्रदेश), निर्मलादेवी चौहान (रा. कालापिपाला, मध्य प्रदेश), लखन सोनी (रा. शहाजांपूर, आंध्र प्रदेश), सुहास विजय गोकावे (रा. सांगली) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कंपनीचे प्रतिनिधी उत्तम नामदेव बालटे (वय ३८, रा. विद्यानगर, आटपाडी) यांनी फिर्याद दिली. भोपाळ येथे निर्मल इन्फ्राहोम कॉर्पोरेशन लिमिटेड ही चिटफंड कंपनी स्थापन केली होती. वरील संशयित कंपनीत कार्यरत होते. सन २०१२ मध्ये कोल्हापूर रस्त्यावर कंपनीचे कार्यालय थाटले. आटपाडी येथील उत्तम बालटे प्रतिनिधी म्हणून नोकरीस होते. ते गुंतवणूकदारांकडून वर्षाला ठेवी गोळा करून कंपनीत भरत होते. बालटे यांच्याकडे आटपाडी व परिसरातील सुमारे २५ गुंतवणूकदारांनी १३ लाख ३२ हजार ४०० रुपयांच्या ठेवी भरल्या होत्या. बालटे यांनी या ठेवी कंपनीच्या बॅंक खात्यावर जमा केल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com