इस्लामपूरचा आरव कोळी चित्रकला स्पर्धेत देशात पहिला | Aarav Koli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aarav Koli
इस्लामपूरचा आरव कोळी चित्रकला स्पर्धेत देशात पहिला

इस्लामपूरचा आरव कोळी चित्रकला स्पर्धेत देशात पहिला

इस्लामपूर - आजादी का अमृत महोत्सवांतर्गत देशपातळीवर भरवण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत कासेगांव शिक्षण संस्थेच्या, यशवंत बालक मंदिर, इस्लामपूरचा इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या आरव अरविंद कोळी याने देशात पहिला क्रमांक पटकावला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या संचालनालयाने २३ ते २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आजादी का अमृत महोत्सवांतर्गत देशपातळीवर भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी तुमचा आवडता स्वातंत्र्य नायक हा विषय देण्यात आला होता. ७ ते १५ वयोगटांमध्ये भारताचे स्वातंत्र्य नायक यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी आवडते स्वातंत्र्य नायक काढायला सांगितले होते. त्याच वेळी त्यांच्या सर्जनशील वृत्तीचा शोध घेतला.

या स्पर्धेत देशभरातून ४१७९ एवढे स्पर्धक सहभागी झाले होते. कासेगांव शिक्षण संस्थेच्या यशवंत बालक मंदिर, इस्लामपूर येथे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या आरव अरविंद कोळी याने या स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

हेही वाचा: भाजप नेत्याबरोबर सतेज पाटलांची बंद खोलीत चर्चा! राजकीय वर्तुळात खळबळ

प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाकडून आरव यास रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रकाशन विभागाच्या प्रतिष्ठित बालभारती या मासिकात आरवच्या प्रथम क्रमांक प्राप्त चित्राची,यशाची नोंद केली जाणार आहे. त्याला बालभारती मासिकात सदस्यत्व दिले जाणार आहे. तसेच बालभारती मार्फत पारितोषिकही दिली जाणार आहे.

७ ते १५ वयोगटातील महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर निवड होणारा आरव हा एकमेव स्पर्धक आहे. द्वितीय क्रमांक चंदिगड या केंद्रशासित प्रदेशातून व तृतीय क्रमांक ओरिसा राज्यातून निवडण्यात आलेला आहे.

आरवच्या या यशाबद्दल कासेगांव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, अधीक्षक ए. डी. पाटील, पर्यवेक्षक एस्. एम्. पवार, एस्. एल्. माने, मुख्याध्यापिका संगिता पाटील, वर्गशिक्षिका पद्मा कोळी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांनी अभिनंदन केले.

loading image
go to top