इस्लामपूर : गार्डीत ७० लाखांची वीज चोरी

इलेक्ट्रिक मीटरच्या टर्मिनलमध्ये बदल करून वापर
sangli
sanglisakal

इस्लामपूर : इलेक्ट्रिक मीटरच्या टर्मिनलमध्ये बदल करून सुमारे ६९ लाख ८६ हजार १४० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी गणेश पोपटराव चोथे (वय ६२, रा. गार्डी, विटा, ता. खानापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘महावितरण’चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (भरारी पथक) व सांगलीचे अधिकारी महेशकुमार राऊत (वय ५१, मूळ रा. अकलूज; सध्या रा. विश्रामबाग, सांगली) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश चोथे याची गार्डी-विटा येथे पॉवरलूम फॅक्टरी आहे. त्याने १३ एप्रिल २०१९ पासून २ मे २०२२ या कालावधीत त्याच्या फॅक्टरीत पॉवर लूमच्या इलेक्ट्रिक मीटरच्या टर्मिनल मधील सीटीचे स्क्रू वेळोवेळी त्याच्या आवश्यकतेनुसार लूज करून व पुन्हा आवळून मीटरमध्ये फेरफार केला. यातून त्याने ३२ महिन्यांत तीन लाख ४९ हजार ४४२ इतक्या वीज युनिटची चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

यातून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे सुमारे ६९ लाख ८६ हजार १४० रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिकारी राऊत यांनी फिर्याद दिली असून चोथे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com