Islampur Crime : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकाला अटक

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पेठ नाका (ता. वाळवा) येथे इस्लामपूर पोलिसांनी केली अटक.
Goa made liquor seized
Goa made liquor seizedsakal

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पेठ नाका (ता. वाळवा) येथे इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील सुमारे ७२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दारूची कारवाई ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

याप्रकरणी ट्रकचालक सल्लू उर्फ सलमान नझरुद्दीन मकानदार (वय २८, रा. माळी कलेक्शनच्या जवळ, महक पान शॉप, मकानदार वाडा, डफळापूर, ता. जत) तसेच जमिर पटेल (रा. कऱ्हाड) या दोघांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मंगळवारी (ता.२४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर पोलिसांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून दारूची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. कऱ्हाड येथे ही दारू नेण्यात येणार असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांना ही माहिती मिळतात त्यांनी सहकारी उदय पाटील, अभिजीत पाटील, विनायक देवळेकर यांना सोबत घेत सापळा रचला. खाजगी वाहनाने पोलीस पेठ नाका येथे दाखल झाले. त्यांनी नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान दहा चाकी अशोक लेलँड ट्रक (क्रमांक एम एच ५० एन. ३९९९) मधून निघालेल्या एका संशयितास पोलिसांनी अडवले.

ट्रकमधील माल तपासून पाहिला असता यातून दारूची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. ही दारू तो कराड भागात विक्रीसाठी घेऊन जात होता. या ट्रकमध्ये सुमारे १ हजार बॉक्स म्हणजे सुमारे ४८ हजार दारूच्या बाटल्या आढळल्या. ट्रक चालक सल्लू उर्फ सलमान नझरुद्दीन मकानदार याला पोलिसांनी अटक केली.

५७ लाख ६० हजार रुपयांची दारू व १८ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ७५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता हा माल गोवा येथून आणला असून तो जमीर पटेल (रा. कराड) यांना विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. जमिर पटेल याचा पोलीस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com