राजारामबापू कारखान्याचे विक्रमी गाळप, वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

इस्लामपूर - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये १० लाख १ हजार २४५ टन इतके विक्रमी उसाचे गाळप केले असून, या युनिटमधील सहविद्युत प्रकल्पामध्ये ९ कोटी ४८ लाख ७९ हजार युनिट वीजनिर्मिती केली आहे. या विक्रमी ऊस गाळप व वीज निर्मितीबद्दल कामगारांनी साखर वाटून कारखाना परिसरात आनंद व्यक्‍त केला. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कारखाना व्यवस्थापन व कामगारांचे अभिनंदन केले.

गेल्याच वर्षी साखराळे युनिटची गाळप क्षमता वाढवून २८ मेगावॉट सहविद्युत प्रकल्प उभारणी केलेली आहे. राजारामबापू साखर कारखान्याने साखराळे, वाटेगांव-सुरुल व कारंदवाडी या तिन्ही युनिटमध्ये एकूण १९ लाख ५२ हजार ९१६ टन उसाचे गाळप करून २४ लाख ७६ हजार ६०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

साखराळे युनिटमध्ये १५० दिवसांत १० लाख १ हजार २४५ टन उसाचे गाळप करून १२ लाख ७७ हजार ९०० क्विंटल, वाटेगांव-सुरुल शाखेत १४१ दिवसात ५ लाख ३२ हजार ५३१ टन उसाचे गाळप करुन ६ लाख ७० हजार ७०० क्विंटल, तर कारंदवाडी युनिटमध्ये १४३ दिवसांत ४ लाख १९ हजार १४० टन उसाचे गाळप करून ५ लाख २८ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतलेले आहे. वाटेगांव-सुरुल व कारंदवाडी या दोन्ही युनिटमध्ये या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली आहे. साखराळे युनिटमधील सहविद्युत प्रकल्पात  ९ कोटी ४८ लाख ७९ हजार ९७३ युनिट वीजनिर्मिती केली असून त्यातील ६ कोटी १० लाख ३८ हजार युनिट वीज महावितरण कंपनीस, तर वाटेगांव-सुरुल शाखेच्या सहविद्युत प्रकल्पामध्ये ३ कोटी ७७ लाख ३० हजार ५०० युनिट निर्मिती केली असून, त्यातील २ कोटी १० लाख १९ हजार ४२५ युनिट वीज महावितरण कंपनीस दिली आहे. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली म्हणाले, ‘‘आमदार जयंत पाटील, अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवता आले. यात संचालक, ऊस उत्पादक सभासद, अधिकारी, कामगार, तोडणी मजूर, कंत्राटदारांचे योगदान आहे.’’

Web Title: islampur sangli news rajarambapu sugar factory galap electricity generation