इस्लामपूर : मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांकडून २१ कोटींच्या कामांना मंजुरी

पूर्वी मंजूर करून आणलेल्या ११ कोटी रुपयांच्या कामांना शासनाकडून मिळालेली स्थगिती उठवण्यात आली आहे.
इस्लामपूर
इस्लामपूर Sakal
Updated on

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : शिवसेनेने शहरातील रस्ते आणि गटारीच्या कामासाठी पूर्वी मंजूर करून आणलेल्या ११ कोटी रुपयांच्या कामांना शासनाकडून मिळालेली स्थगिती उठवण्यात आली आहे. ते ११ कोटी आणि रस्त्यांच्या कामासाठी आणखी १० कोटी रुपये असे मिळून सुमारे २१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आनंदराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आता तरी शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून या विकासकामांना मंजुरी देण्याच्या ठरावासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आनंदराव पवार म्हणाले, "शासनाकडून ११ कोटी रुपये कामांना मंजुरी आली होती. त्या कामांच्या ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादीने गैरहजर राहून या कामांना खो घातला होता. त्यामुळे शहरात प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून त्या कामांची स्थगिती उठवली आहे. याशिवाय अन्य १० कोटी रुपयांची कामे मंजूर करून आणली आहेत. हा निधी शहरातील सर्व प्रभागांसाठी वापरला जाणार आहे, फक्त विकास आघाडी किंवा शिवसेनेसाठी ही रक्कम नसल्याने राष्ट्रवादीने मोठ्या मनाने या कामांना पाठिंबा द्यावा. भुयारी गटरच्या कामासाठी शहरात अनेक ठिकाणी रस्ते उकरण्यात आले आहेत. नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही कामे मार्गी लागल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी आणि शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा निधी मंजूर केला असून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. हा शिवसेनेच्या प्रयत्नातूनच आणलेला निधी आहे, हे श्रेय घेणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. हे काम होणार याची खात्री असल्यानेच सभागृहात आणि बाहेरही आम्ही वारंवार ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणणार, असा शब्द दिला होता आणि आम्ही ते करून दाखवले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com