धनगर आरक्षणासाठी सांगलीतील झरे पंचक्रोशीत कडकडीत बंद

सदाशिव पुकळे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

झरे -  झरे व परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला पाठींबा म्हणून झरे, निंबवडे, कामथ, जांभूळणी, घानंद, घरनिकी विभूतवाडी या गावात बंद पाळण्यात आला.

झरे -  झरे व परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला पाठींबा म्हणून झरे, निंबवडे, कामथ, जांभूळणी, घानंद, घरनिकी विभूतवाडी या गावात बंद पाळण्यात आला.

झरे व कामथ येथे आज शाळा, महाविद्यालये  बंद ठेवण्यात आली. येथे भरणारा आजचा आठवडा बाजारही बंदमुळे भरला नाही. माण, खटाव, सांगोलाहून येथे व्यापारी बाजारासाठी येत असतात, पण आज बंद असल्याने बाजार रद्द करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बंदला पाठींबा दिला आहे. तसेच व्यापारी वर्गानेही पाठिबा दिला आहे.

 

घनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आज झरे बंद ठेऊन पाठिबा देत आहोत.

- नारायण चवरे, माजी उपसभापती  

आरक्षणच्या लढ्याला बळ मिळणेसाठी, व धनगड या शब्दाची  धनगर अशी दुरुस्ती व्हावी यासाठी आज बंद ठेवला आहे.

- बंडू कतुरे पाटील, शिवसेना नेते.

शासनाने इतर राज्याप्रमाणे शब्दाची दुरुस्ती करावी

- शिवराम मासाळ, धनगर समाज नेते

या आंदोलनाने शासन जागे झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल

- चंदकांत पावणे, सरपंच विभूतवाडी 

शब्दाच्या दुरुस्तीसाठी लढा

धनगर आणि धनगड अशी शब्दाची फिरवाफिरवी झाल्याने आजपर्यंत हा समाज विविध सुविधापासून वंचित राहिला आहे. राज्यामध्ये एकही धनगड नाही. काही राज्यात शब्दाची दुरुस्ती केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राने दुरुस्ती करावी यासाठी समाजाचा लढा सुरु आहे

Web Title: issue of Dhangar reservation Bandh in Zhare region