पैसा, दमदाटीवर चालतो कोल्हापूर पालिकेतील पाणी विभाग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर पुन्हा नवी १४ इंची पाईपलाईन टाकायला भाग पाडू, असा इशारा दिला. 

कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर पुन्हा नवी १४ इंची पाईपलाईन टाकायला भाग पाडू, असा इशारा दिला. 

बैठकीत नगरसेवकांनी अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल जलअभियंत्यांवर प्रश्‍नांचा भडिमार करत धारेवर धरले; तर काही नगरसेवकांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनाबद्दल जलअभियंत्यांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबपुष्प देऊन निषेध नोंदविला. ताराराणी सभागृहात ही बैठक झाली.

सौ. बनछोडे म्हणाल्या, की पाणी येत नाही. भागातील नागरिक त्रस्त आहेत. यावर काही उपाययोजना करणार का? नगरसेवक संजय मोहिते यांनी शहरात सर्वच ठिकाणी पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. यावर तत्काळ नियोजन करावे, अशी सूचना मांडली. पूजा नाईकनवरे यांनी संतप्त होत पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही यंत्रणा हलत नाही. टाकी बांधून घेतली; पण पाणी नसेल तर काय फायदा? १४ इंची पाईपलाईन टाका, अन्यथा टाकलेली आठ इंची पाईपलाईन खोदली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रा. जयंत पाटील यांनी सदस्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक का, असा प्रश्‍न उपस्थित केला.

नगरसेविका सुरेखा शहा यांनी महाडिक वसाहत, बापट कॅम्प भागात पाणी येत नाही. काही भागात जास्त वेळ पाणी सोडले जाते, तर काही भागात पाणी सोडलेच जात नाही. नियोजन नसल्याने पाणीपुरवठा होत नाही. किती दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करणार ते सांगा? असा प्रश्‍न उपस्थित करीत जलअभियंत्यांना धारेवर धरले. राजसिंह शेळके यांनी पाणीपुरवठ्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याकडे लक्ष वेधले.

नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, निलोफर आजरेकर, राहुल चव्हाण यांनीही प्रशासनावर प्रश्‍नांचा भडिमार केला. पाणीपुरवठा यंत्रणेसह प्रशासनातील पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सदस्यांनी महापौरांकडे केली. अखेर महापौर मोरे यांनी नियमित पाणीपुरवठ्यासाठी आठ दिवसांत महासभा घेऊन आयुक्तांना सूचना देऊन यावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. 

धनादेश देण्यात गडबड का? ः शेटे
उपमहापौर भूपाल शेटे यांनी शहरात एवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत का होतो? पंप किती वेळ सुरू असतात? शहरात अजून ४० गळती आहेत, याबाबत कंत्राटदार काय करतोय? त्यांना किती पैसे दिले? शहरातील काही भागाला २४ तास पाणी द्यायचे, आणि काही भागाला पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही, अशी परिस्थिती का निर्माण होते? मार्केट यार्डातील पाण्याच्या टाकीत पाणी नाही. या कंत्राटदाराची चौकशी सुरू असताना त्यांना २५ लाखांचा धनादेश जलअभियंत्यांनी दिला, असे सांगितले. 

बैठकही विस्कळीतच
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहेच; पण त्याच्या नियोजनासाठी झालेली बैठकही विस्कळीतच झाल्याचे विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

Web Title: issue of Kolhapur Corporation water department