आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 18 जून 2018

सातारा - राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित होते. ही बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्या कालावधीस मुदतवाढ (दोन जुलै) देण्यात आली आहे. 

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत अर्ज भरणे, दोन जुलैला मूळ कागदपत्रांआधारे अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित आहे. हा अर्ज विद्यार्थ्यांनी नजीकच्या आयटीआयमध्ये जाऊन शुल्क भरून निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. पाच जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर त्याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

...असे आहे वेळापत्रक 
 ऑनलाइन अर्ज करणे : ३० जूनपर्यंत 
 प्रवेश अर्ज निश्‍चित करणे : दोन जुलैपर्यंत 
 पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : तीन जुलैपर्यंत 
 प्राथमिक गुणवत्ता यादी : पाच जुलै रोजी सकाळी ११ वाजता 
 गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : पाच ते सहा जुलै 
 अंतिम गुणवत्ता यादी : १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता 
 पहिली प्रवेश फेरी : १० जुलै 
 दुसरी प्रवेश फेरी : ११ ते १६ जुलै 
 तिसरी प्रवेश फेरी : २१ ते २६ जुलै 
 चौथी प्रवेश फेरी : ३१ जुलै ते चार ऑगस्ट

Web Title: ITI Admission Time Table Changes