सांगली : भाजपला अठराचा आकडा गाठणे कठीण - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाने कितीही नगरसेवक, कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली तरीही त्यांचे 18 उमेदवारही निवडून येणार नाहीत, असे भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केले.  

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. आमदार सुमन पाटील प्रमुख उपस्थित होत्या. त्यांचा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. 

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती रहा, बुथला 20 जणांची समिती करा, असे आवाहन करण्यात आले. स्थापन झालेल्या समित्यांचा आढावा घेण्यात आला.  

पाटील म्हणाले,"काँग्रेसशी आघाडीबाबत बोलणी सुरु आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा सुरु आहे. निवडणुक राष्ट्रवादी ताकदीने लढणार आहे. आघाडी झाली तर हुकमी सत्ता येणार आहे. निवडणुकीत यशासाठी भाजपाने फोडाफोड सुरु केली. मिरजेतील काहींना प्रवेश दिला. त्यात कॉंग्रेसचे लोक मोठ्या संख्येने आहेत. यापूर्वी भाजपाचे नऊ जण निवडून येतील, असे चित्र होते. फोडाफोडी, मतदारांना आमिष दाखवले तरीही भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 16-18 पेक्षा जास्त नसेल. मिरजेतील जे भाजपात गेलेत त्याचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. उलटपक्षी त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देता येईल.''  

शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, शरद लाड, भारत देशमुख, बाबासाहेब मुळीक, मनोज शिंदे, हणमंतराव देसाई, बाळासाहेब होनमोरे, हणमंत पाटील, आनंदराव पाटील, मीनाक्षी आक्की, कल्पना कोळेकर, नंदाताई पाटील आदी उपस्थित होते.   

एक बुथ, वीस कार्यकर्ते   
लोकसभा, विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर एक बुथ वीस कार्यकर्ते अशी रचना करायची आहे. 10 युवक, पाच महिला आणि पाच ज्येष्ठांचा समावेश असेल.   

"पक्षाचे कार्यक्रम तळागाळात पोहोचवण्यासाठी एक पक्षाने ऍप तयार केले आहे. निवडणुक पूर्व तयारी, संदेश, पक्षाचा कार्यक्रम पाठवला जाईल.''   
- आमदार जयंत पाटील   

Web Title: its hard to achieve 18 seats in sangali municipal corporation said jayant patil