चालकाचा मुलगा बनला आयपीएस; कौतुकाचा वर्षाव

जगदीश अडहळ्ळी यांची यशोगाथा : मोळे गावचा वाढला लौकिक
Jagdish Shrikant Adhalli
Jagdish Shrikant AdhalliSakal

अथणी : जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, हे मोळे (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील जगदीश श्रीकांत अडहळ्ळी (Jagdish Shrikant Adhalli) यांनी दाखवून दिले आहे. चालक (Driver) म्हणून काम करणारे वडील श्रीकांत यांनी प्रोत्साहन दिल्याने जगदीश हे आंध्रप्रदेशमध्ये (Andhra pradesh) आयपीएस अधिकारी (IPS) बनले आहेत. त्यांच्या या यशोगाथेमुळे मोळे गावचा लौकिक वाढला आहे.

जगदीश अडहळ्ळी हे युपीएससी परीक्षा 440 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांची आंध्रप्रदेश केडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जगदीश यांची आता कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस (एएसपी) म्हणून नियुक्ती झाली आहे.

Jagdish Shrikant Adhalli
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटनाला उधाण

जगदीश यांनी प्राथमिक शिक्षण कवलगूड, माध्यमिक शिक्षण मोळे हायस्कूल, पदवीपूर्व शिक्षण अथणी तर पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगाव येथील गोगटे कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली‌‌. त्यासाठी दिल्ली येथे कोचिंग क्लास लावला.

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) 2019 च्या बॅचच्या केएएस परीक्षेत 23 वा क्रमांक मिळविलेल्या जगदीश अडहळ्ळी यांनी यापूर्वी कलबुर्गी येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी जगदीश एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचा नावलौकिक वाढविला आहे. ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण जगदीश यांनी घालून दिले आहे. त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे.

Jagdish Shrikant Adhalli
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या

आपला मुलगा जगदीश हा आयपीएस अधिकारी झाला. त्याचा आपणास अभिमान वाटतो. कारण घरची आर्थिक परिस्थिती नसताना तो या पदापर्यंत पोहोचला आहे. त्याने आमच्या कुटुंबीयांची व गावाचे नाव मोठे केले आहे.

-श्रीकांत,अडहळ्ळी, वडील, मोळे (ता. कागवाड)

ग्रामीण तरुणांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पहावीत. त्याला आत्मविश्वास, जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यशापासून कोणीही रोखू शकणार नाही.

-जगदीश अडहळ्ळी, एएसपी, आंध्र प्रदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com