सोलापुरात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा निर्माण होण्यास मदत

Jalyukt Shivar Scheme helps to increase water level in Solapur
Jalyukt Shivar Scheme helps to increase water level in Solapur

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन  २०१६- १७ मध्ये  २६५ गावांमध्ये ४४६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४३७ कामे पूर्ण झाली असून  त्यावर २४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे.

शिवाय लोकसहभागातून पूर्ण झालेली ३०३ कामे असून त्याचे मूल्य २४ कोटी १५ लाख रुपये इतके आहे. या सर्व कामांमुळे ६०५. ४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण होऊन ४२३८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली असल्याची माहिती  जिल्हा परिषद (ल .पा) जिल्हा जलसंधारण अधिकारी तुकाराम देवकर यांनी  दिली.

मोहोळ येथे लघुपाटबंधारे उपविभागीय  कार्यालयात जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषद सेस सन  २०१७-१८ व सन २० १८ - १९ चे कामाचे नियोजन व  आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर देवकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली . 

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६ - १७ मध्ये घेण्यात आलेल्या कामामध्ये पाझर तलाव दुरुस्ती - २७२, गाव तलाव दुरुस्ती - ३४, सिमेंट बंधारे - ८३, नाला खोलीकरनाची - २६, कोल्हापूर पद्धतीचे  बंधारे दुरुस्ती -  ५, पाझर तलाव पूर्ण करणे - ७ , व पाझर तलाव खोलीकरणाचे  १ काम अशा कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लोकसहभागातून पाझर तलाव व गाव तलावातून गाळ काढणे, नाला खोलीकरण व रुंदीकरनाची  ३०३ कामे पूर्ण करण्यात आले असून लोकसहभागातून झालेल्या या कामांचे  मूल्य २४ कोटी १५ लाख इतके आहे . या कामातून १३५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण होऊन १०७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  येण्यास मदत झाली आहे . तर या शासकीय व लोकसहभागातील सर्व कामामुळे निर्माण झालेला व पुनर्स्थापित झालेला पाणी साठा ६०५.४० दशलक्ष घनफुट झाला असून यामुळे ४२३८ हेक्टर क्षेत्र सिंचना खाली आले आहे असेही जलसंधारण अधिकारी देवकर यांनी सांगितले .        

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८  मध्ये २६५ गावांमध्ये ६९२ कामांना प्रशासकीय मान्यता घेऊन ६८४ कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यरंभ आदेश देण्यात आलेले आहेत. यापैकी १०८ कामे पूर्ण झाली असून, या कामावर ३ कोटी ३३ लाख खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित कामे सप्टेंबर २०१८ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून तसे नियोजन करण्यात आले असल्याचेही  देवकर यांनी सांगितले.  

या बैठकीस जिल्ह्यातून मोहोळ व कुर्डुवाडी  उपविभागाचे जलसंधारण अधिकारी  पी . बी . भोसले, बार्शी चे  एम. एम. सोनवणे, माळशिरसचे  इंगळे, दक्षिण सोलापूर चे  एम के मुल्ला, अक्कलकोट चे  सि व्ही घोळवे , पंढरपूरचे  गुंड आदी उपअभियंता, जिल्हा जलसंधारण कार्यालयातील चौघुले, लाड, पारसे आदिंसह सर्व जलसंधारण उपविभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८- १९ मध्ये ११८ गावामध्ये २४२ कामांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ११८ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेत आहेत.लवकरच कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू केली जातील, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तुकाराम देवकर यांनी सांगितले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com