जांबरे प्रकल्प शंभर टक्‍के भरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

चंदगड - जांबरे (ता. चंदगड) प्रकल्प काल (ता. ७) सायंकाळी भरला. सांडव्याचे काम अपूर्ण असल्याने गेली दोन वर्षे तो ९७ टक्‍के भरत होता. यंदा मात्र सांडव्याचे काम पूर्ण झाल्याने पूर्ण क्षमतेने साठा झाल्याचे उपअभियंता बी. एम. पाटोळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा पंधरा दिवस आधीच हा प्रकल्प भरला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिमेला कोकण सीमेवरील हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पूर्णत्वास आला. मात्र सांडव्याचे काम काही अंशी अपूर्ण होते. २३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीक्षमतेच्या या प्रकल्पात गेली दोन वर्षे ९७ टक्के साठा केला जात होता. यंदा मात्र तो १०० टक्के भरला. 

Web Title: jambhare project hundred percent full