जामखेड हत्याकांडाचा सहा जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जामखेड -शहरातील योगेश व राकेश राळेभात या बंधूंच्या हत्येप्रकरणी जामखेड पोलिसांनी काल रात्री उशिरा गोविंद गायकवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी पसार झाले आहेत.

मृत योगेशचा भाऊ कृष्णा अंबादास राळेभात (वय ३४) यांनी जामखेड ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गेल्या वर्षी जामखेडमधील उल्हास माने यांच्या तालमीतील पैलवानांबरोबर राजकीय फलक लावण्यावरून योगेशचे भांडण झाले होते. त्या रागातूनच शनिवारी सायंकाळी हे दुहेरी हत्याकांड झाले. 

शिंदेंना  रुग्णवाहिकेतून पळविले
जामखेडमधील गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात आले. मात्र, त्या वेळी त्यांना संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. समजावून सांगूनही जमाव शांत होत नव्हता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जमावाच्या तावडीतून बाहेर काढीत शिंदे यांना अक्षरशः रुग्णवाहिकेतून पळविले.

‘जामखेड बंद’ला प्रतिसाद
योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘जामखेड बंद’ला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार आज पूर्णपणे बंद होते.  राळेभात बंधूंच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी आज ‘जामखेड बंद’ची हाक दिली होती.

Web Title: Jamkhed murder case