मुख्य आरोपी गायकवाडला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जामखेड/नगर - जामखेड येथील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी गोविंद गायकवाड व एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी बुधवारी (ता.3) रात्री अटक केली. त्याने राळेभात बंधूंना गोळ्या घातल्याची कबुली दिल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. 

जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची शनिवारी (ता. 28) पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी योगेश राळेभात याच्या भावाच्या फिर्यादीवरून गोविंद गायकवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी जामखेडचे माजी सरपंच कैलास माने व प्रकाश माने यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी गोविंद गायकवाडसह अन्य एकाला पहाटे काल अटक केली. गोविंद गायकवाड, एक अल्पवयीन मुलगा व विजय आसाराम सावंत (रा. वाकी, जामखेड) यांनी दुचाकीवरून येऊन राळेभात बंधूंना गोळ्या घातल्याचे गायकवाड याने सांगितले. पोलिस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. 

Web Title: Jamkhed murder case main accused Gaikwad arrested

टॅग्स