भाजपच्या तंबूत जनता दल? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

राधानगरी - राष्ट्रवादीशी जवळीक साधलेल्या जनता दलाने अनपेक्षितपणे भाजपशी युती करून आपल्या पदरात एक जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती मतदारसंघ पदरात पाडून घेतले; तर शेका पक्षाने राष्ट्रवादीशी युती करून राशिवडे पंचायत समितीवर हक्क सांगितला आहे. दरम्यान, कॉंग्रेस व भाजपकडून जाहीर झालेल्या फेजिवडे पंचायत समितीचे उमेदवार ऐनवेळी बदलण्यात आले आहेत. यातून साळोखे व तायशेटे गटात समेट झाल्याचीही चर्चा आहे. 

तालुक्‍यातील अनेक आश्‍चर्यकारक घडामोडी आता पुढे येऊ लागल्या आहेत. गेली अनेक वर्षे नैसर्गिक मैत्री असलेल्या राष्ट्रवादी व जनता दलाचे सरवडे गटाच्या उमेदवारीवरून बिनसले. त्यानंतर जनता दलाशी तातडीने संधान साधत भाजपने आपल्या तंबूत घेऊन त्यांना सरवडे जिल्हा परिषद गटासह येथील पंचायत समिती व सोळांकूर, फेजिवडे पंचायत समितीच्या जागा सोडल्याचे अधिकृत वृत्त आहे. सरवडे आणि फेजिवडे येथे जनता दलाचे असलेले प्राबल्य विचारात घेता भाजपने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. 

दुसरीकडे राधानगरीमधील जिल्हा परिषदेच्या जागेवरून सुधाकर साळोखे आणि अभिजित तायशेटे यांच्यात रुंदावलेली दरी कमी करण्यात कॉंग्रेसला यश आल्याचे समजते. त्याबदली कॉंग्रेसने याआधी घोषित केलेली फेजिवडे गणाची जागा आता साळोखे गटासाठी सोडल्याचे पुढे आले आहे; तर राष्ट्रवादीने राशिवडे पंचायत समितीची जागा शेका पक्षाला देऊन पुढील राजकीय नांदी निश्‍चित केली आहे.

Web Title: Janata Dal party enters bjp

टॅग्स