जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 29 जून 2018

मंगळवेढा : शहरातील आरोग्य विभागात असलेली ठेकेदारी पध्दत कायमची बंद करण्यात यावी, केलेल्या रस्त्याच्या कामातील दर्जाबाबत चौकशी करण्यात यावी या मागणी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन नगरपलिकेच्या समोर करण्यात आले.

मंगळवेढा : शहरातील आरोग्य विभागात असलेली ठेकेदारी पध्दत कायमची बंद करण्यात यावी, केलेल्या रस्त्याच्या कामातील दर्जाबाबत चौकशी करण्यात यावी या मागणी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन नगरपलिकेच्या समोर करण्यात आले.

यावेळी जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, कोषाध्यक्ष बलभिम माळी, पप्पू दत्तु, युवराज कौडूभैरी, मधुकर कौडूभैरी, बापू कौडूभैरी, येताळा खरबडे आदीसह या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी या संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी याबाबत निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात स्वच्छतेचा दिखावा करण्यात आला असून गटारी तुंबल्या स्वच्छतेबाबत लक्ष दिले नाही. त्यामुळे या कामाबाबत असलेली ठेकेदारी पध्दत कायमची बंद करण्यात यावी शिवाय शहरात केलेले रस्ते देखील दीड वर्षाच्या आता खराब झाले असून या कामाचे बील अदा केले असून दुरुस्तीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ केली जात असल्याने शेवटी धरणे आंदोलन करण्याचा मार्ग स्विकारला असल्याचे निवेदनात नमुद केले.

नगरपलिकेच्या वतीने ठेकेदारी पध्दत बंद करण्याबाबतचा विषय सभेसमोर ठेवला जाईल आणि केलेल्या रस्ते कामाची चौकशी करुन संबधित ठेकेदावर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारीच्या सहीचे लेखी पत्र अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना पालिकेच्या वतीने पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगौड यांनी दिल्यानंतर हे धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले. पालिकेडून या प्रकरणातील कागदपत्रे घेऊन दोन जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे संस्थापक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

शहरात स्वच्छता ठेवली जात नाही, नागणेवाडी परिसरात रस्त्याबाबत तक्रार करुन लक्ष दिले नाही, प्रभारी मुख्याधिकाय्रांना मंगळवारी व शुक्रवारी पालिकेत हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना असताना त्याही कमी वेळ असल्याने शहरातील समस्याबाबत न्याय कुणाला मागायचा म्हणून धरणे आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला.
- बलभिम माळी, कार्याध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

Web Title: janhit shetkari sanghtana on dharna agitation