बेळगाव जिल्ह्यात 'या' तिघांना भाजपची उमेदवारी

महेश काशीद
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि भाजप नेत्यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारी घोषित करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

बेळगाव - निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होताच कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज (ता.14) बंगळूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तीन बंडखोर कॉंग्रेस आमदारांचा समावेश आहे. गोकाक येथून रमेश जारकीहोळी, अथणीतून महेश कुमठळ्ळी आणि कागवाड संघातून श्रीमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दरम्यान अपात्र आमदार संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निकाल घोषित झाला. अपात्रांना निवडणूक लढण्यासाठी मुभा दिली. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस आणि धजदच्या बंडखोरांना भाजपने आज (ता.14) प्रवेश दिला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि भाजप नेत्यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला. त्यानंतर उमेदवारी घोषित करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गोकाकला रमेश जारकीहोळी, अथणीमधून कुमठळ्ळी आणि कागवाड येथून पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

बेळगावमध्ये येथे तयार होत होत्या बनावट नोटा

भाजप राष्ट्रीय कार्यकारणीत विषयावर चर्चा झाली. अंतिम निर्णय घोषित झाला. त्यानुसार भाजपचे सरचिटणिस अरुणसिंग यांनी आज (ता.14) उमेदवारांची घोषित केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारलेल्या उमेदवारांना कमळ चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. जिल्ह्यामधील तिन्ही मतदार संघातील निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील या मंदिरात चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास 

लक्ष्मण सवदींना हुकली उमेदवारी 
पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी घोषितची शक्‍यता होती. भाजप पक्षश्रेष्ठींनी सवदींना डावलून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सवदी यांची संधी हुकली. कॉंग्रेसतर्फे अजून उमेदवारी घोषित झाली नाही. पण, माजी खासदार प्रकाश हुक्केरी वा माजी आमदार राजू कागे यांना अथणी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे संघातील निवडणूक चुरशीची असणार आहे. सहा महिन्यांपूर्वी कॉंग्रेस उमेदवार कुमठळ्ळी यांना भरघोस मताधिक्‍यांनी देऊन मतदारांनी विजयी केले. आता ते भाजपच्या उमेदवारीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मतदार परत कुमठळ्ळी यांच्या पाठीशी राहणार वा नवीन चेहऱ्याला येथून संधी देणार? त्याचे औत्सूक्‍य निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jarkiholi Kumathalli Shrimant Patil are BJP contestant