तहसीलदारांवर शेतकऱ्यांची दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

जत - साळमळगेवाडी (ता. जत) येथील वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्यास गेलेल्या तहसीलदार अभिजित पाटील यांच्यावर शेतकऱ्यांनी पोलिस निरीक्षकांसमोर दगडफेक केली. यात तहसीलदार पाटील जखमी झाले. विशेष पोलिस बंदोबस्त असतानाही तहसीलदारांवर हल्ला झाला. मात्र, पोलिसांनी आपल्या बळाचा वापर केला नाही याचे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

साळमळगेवाडी येथील खलाटीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बिरोबा ज्ञानू मासाळ यांनी अडविला आहे. तीन वर्षांपासून हा रस्ता खुला करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती. यासंदर्भात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून रस्ता खुला करून देण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, शेतकरी रस्ता खुला करून देत नसल्याने गावकऱ्यांनी पुन्हा तहसीलदारांकडे दाद मागितली होती.
त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी रस्ता खुला करून देण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, आज सकाळी दहा वाजता तहसीलदार रस्ता खुला करून देण्यासाठी घटनास्थळी गेले होते.

Web Title: jat sangli news farmer stone attack on tahsildar