Gopichand Padalkar vs Jayant Patil
esakal
जत साखर कारखाना विक्रीवरून राजकीय वाद तापला
आमदार गोपीचंद पडळकरांचा संघर्षाचा इशारा
कारखाना सभासदांना परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाची तयारी
जत : जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या मनमानीने दिवाळखोरीत निघाला. पुढे कवडीमोल किंमतीत विकला गेला. हा कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई तर लढू. प्रसंगी रस्त्यावर उतरू. आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असेल, असे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता पत्रकार बैठकीत दिले.