
Sangli Politics
esakal
जिल्हा बँक नोकरभरती घोटाळा चौकशीकडे – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कमी तारणावर जादा कर्ज देणे व नोकरभरतीतील गैरव्यवहार यांची चौकशी होणारच, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
जयंत पाटील यांची बचावात्मक भूमिका – पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ‘मी अध्यक्ष नाही, संचालक नाही’ असे सांगत जयंत पाटील यांनी थेट उत्तर देणे टाळले; चंद्रकांत पाटील यांना ‘राज्यात महापूर आहे आणि ते काय करत आहेत’ अशा शब्दांत टोला.
राजकीय पातळीवरील तणाव वाढतोय – जिल्हा बँकेवर सध्या जयंत पाटील यांचा प्रभाव असून समर्थक अध्यक्ष आहेत; यापूर्वी स्थगित झालेली चौकशी पुन्हा सुरू करण्याबाबत दबाव; पाटील यांनी चौकशीसाठी उपोषणाची तयारी दर्शवली.
Sangli Jilha Bank Politics : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती घोटाळ्याची आता चौकशी होणारच, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीतील सभेत दिला होता. याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हात वर केले. ‘मी या बँकेचा अध्यक्ष नाही, संचालक नाही’ असे सांगत त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. ‘राज्यात काय सुरू आहे (महापूर, अतिवृष्टी) आणि चंद्रकांत पाटील यांचे काय चालले आहे’, अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री पाटील यांना टोलाही लगावला.