भाजप विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार - जयंत पाटील

भाजप विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार -  जयंत पाटील

सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे. 

 यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना एकत्र करणार असून यामध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही आम्ही निमंत्रण दिले आहे. याबाबतचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या येत्या बैठकीत घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. अशी माहितीही आमदार पाटील यांनी दिली.

यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत 25 रुपयांनी पेट्रोल वाढवून पुन्हा 5 रुपयाने पेट्रोलचे दर कमी करणे म्हणजे सर्व कपडे काढून घेऊन फक्त अंगवस्त्र परत देण्याचा प्रकार असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा समाचार घेत सातारा मधून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय    पक्षाचे प्रमुख शरद पवार घेतीलच मात्र काही लोकांच्या स्वभावाला औषध नसते मात्र त्यांच्या मनात तसं काही नसते असा टोला पाटील यांनी लगावत शेवटी उदयनराजे हे राष्ट्रवादीचेच खासदार आहेत आणि ते पक्षासोबतच आहेत असा खुलासा करीत त्यांची भावना कधीही पक्ष विरोधातील नाही असे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com