esakal | फेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा? जयंत पाटलांचे ट्विट चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा?

फेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सांगली : फेसबूक आणि ट्विटरवर (facebook, twitter) बंदीबाबत केंद्र शासन निर्णय घेईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत लोक उघडपणे बोलत आहेत. केंद्र (decision of central government) शासनाच्या विरोधात सोशल माध्यमातून (social media) संताप व्यक्त होताना दिसतोय. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज खोचक ट्विट केले आहे. "ट्वीटर आणि एफबीवर उद्या बंदी येण्याची शक्यता आहे.... फेकबूक आणि ट्विटरनंतर आता पुढे कोण?’’ असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. त्यावर भाजप समर्थकांसह राष्ट्रवादीचे समर्थकही जोरदार ‘रिॲक्ट’ होत आहेत.

जयंतरावांनी पुढे कोण असा प्रश्‍न करताना एक ‘हिंट’ दिली आहे. ‘ट्विटर-एफबी-आयजी हे लोकांना केंद्र शासनाच्या विरोधात भडकावत आहेत. प्रतिलिटर १०० रुपये इतके पेट्रोलचे दर (increased rate of petrol) आकाशाला टेकलेले असताना...’’ अशी खोचक टिका जयंत पाटील यांनी केली आहे. लोकांमध्ये सध्या रोष आहे. महागाईने टोक गाठले आहे. कोरोना अनियंत्रित झाला आहे. रुग्ण मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अशावेळी फेसबूक आणि ट्विटर या सोशल माध्यमांविरद्ध केंद्राने युद्ध छेडल्यासारखी परिस्थिती आहे. त्यावरच चर्चा झडत आहेत. दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल, अशी चर्चा होत असताना राजकीय नेते त्यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: अबब! दीडशे किलोचा ‘वाघळी’ मासा सापडला जाळ्यात