राजू शेट्टी, सदाभाऊंचे मतभेद चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कामेरी - विरोधी आघाडी ही खिचडी बनली आहे. ही आघाडी निर्णायक निर्णय देऊ शकत नाही. केंद्राच्या अर्थसंकल्पावेळी खासदार राजू शेट्टी यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे नसल्याचे म्हटले. याच पक्षातील राज्यमंत्र्यांनी मात्र अर्थसंकल्पाचे कौतुक केले. यावरून या दोघांतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. शेतकऱ्याच्या मालाचे दर कमी करण्याचे काम भाजप करत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

कामेरी येथे राष्ट्रवादीच्या प्रचार प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ""विरोधकांच्याकडे कोणाताही विकासात्मक कार्यक्रम नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र जिल्हा परिषदेत प्रभावीपणे काम केले आहे. 523 नळ पाणीपुरवठा योजना, जलसंधारण योजना, 92 ग्रामपंचायत इमारती, तीर्थक्षेत्र विकास योजना अशी विकासकामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळा डिजिटल बनवल्या. आमचा पक्ष सत्ता भोगण्याचे काम करीत नाही. विकास करण्यासाठी काम करतो.'' 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, ""या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून व आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा डोंगर उभा करण्यात आला आहे.'' 

या वेळी छाया पाटील, प्रतिभा पाटील, धनश्री माने, सुस्मिता जाधव, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, शशिकांत पाटील यांची भाषणे झाली. राजारामबापू कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, भैरवदेव पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील, सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच अनिल पाटील, कुणाल पाटील, भगवान पाटील, बी. के. पाटील, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते. 

Web Title: jayant patil kameri sabha