
जयंत पाटील यांनी सांगलीतील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
esakal
हायलाइट समरी पॉइंट्स
तातडीची मदत व कर्जमाफीची मागणी – जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना एकरी ₹५० हजार मदत आणि तातडीने ₹२५ हजारांचा हप्ता देण्याची मागणी केली.
नुकसानीचे गांभीर्य – अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, घरे-संसार वाहून गेले, शेतात दगड-गोटे साचले असल्याने शेतकऱ्यांवर मोठा खर्च ओढवणार आहे.
कर्जमाफीसाठी ‘हीच योग्य वेळ’ – सरकार पुढील निवडणुकीची वाट पाहत बसू नये, सध्याच्या संकटातच कर्जमाफी करावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Sangli Jayant Patil : ‘‘मराठवाड्यासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी संकटात आहे. त्याची शेती वाहून गेली आहे. त्याची कर्जमाफी करायची हीच योग्य वेळ आहे. राज्य सरकारने त्यासाठी पुढच्या निवडणुकीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. या संकटात शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा आणि तातडीने ५० हजार रुपयांचा हप्ता द्या,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
सांगली जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतीबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल देण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.