esakal | 'मंत्र्यांच्या मागे फिरणारे अधिकारी खूप आहेत, मात्र ते काय कामाचे नसतात'
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

जिल्ह्यातील शाळा राज्यात आदर्श करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

'मंत्र्यांच्या मागे फिरणारे अधिकारी खूप आहेत, मात्र ते काय कामाचे नसतात'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : समोर फाईल आली की हे काम होतय किंवा नाही... एस ऑर नो, हा निर्णय फटाफट झाला पाहिजे. असे अधिकारीच गरजेचे असतात. मंत्र्यांच्या मागे फिरणारे अधिकारी काही कामाचे नसतात, अशी फटकेबाजी आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली. येथील जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शाळा उपक्रमात शिक्षणासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ‘अधिकारी वर्गा’वर टोलेबाजी केली.

हेही वाचा: Mumbai Airport: गर्दीच्या ढिसाळ नियोजनाबाबत व्यक्त केला खेद

जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून संजयकुमार राठोड यांची नियुक्ती झाली आहे. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, ‘‘या राठोड साहेबांनी शोधून इथे आणला आहे. त्यांची बदली दुसरीकडे झाली होती. परंतू, मला जिल्ह्यात आदर्श शाळा उपक्रम प्रभावीपणे राबवणारा अधिकारी हवा होता. मी सीईओ जितेंद्र डुडी यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी राठोड यांना शोधू काढले. मी कोल्हापूर जिल्ह्यात एका प्रांतांची हुशारी पाहिली आणि पटकन महसूल मंत्र्यांना सांगून त्यांची बदली जिल्ह्यात करून घेतली. कामाची माणसे महत्वाची असतात. त्यांनी मंत्र्यांचेच एकले पाहिजे, असे अजिबात नाही. सामान्य माणसाची कामे फटाफट झाली पाहिजे. त्यासाठी कामाची हातोटी असायला हवी. मंत्र्यांच्या मागेमागे फिरणारे खूप आहेत, मात्र ते काही कामाचे नसतात.’’

जिल्ह्यातील शाळा राज्यात आदर्श करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यादृष्टीने काम अतिशय प्रभावीपणे सुरु असल्याबद्दल जयंत पाटील यांनी सीईओ डुडी यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

loading image
go to top