कार्यकर्ते म्हणताहेत, पाटील साहेब तुम्हीसुद्धा...!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शासनाने जाहीर केलेल्या मदतीवर स्वतःचे फोटो आणि नाव असलेले स्टिकर लावून भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी पूरग्रस्तांना गहू, तांदूळ पुरविले. यामुळे सोशल मीडिया हळवणकरांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांना पाठविण्यात येणाऱ्या वस्तूंवर स्वत:चे स्टिकर लावल्याने त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. जयंत पाटील साहेब तुम्ही पण? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.  

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरातील जनता पुढे सरसावली आहे. तसेच शासनानेही मदत जाहीर केली. मात्र, राजकीय नेते या परिस्थिती देखील स्वत:ची जाहिरात करण्यात मागे पडत नाहीत, त्यामुळे पूरग्रस्तांसह राज्यातील इतर नागरिकांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

शासनाने जाहीर केलेल्या मदतीवर स्वतःचे फोटो आणि नाव असलेले स्टिकर लावून भाजप आमदार सुरेश हळवणकर यांनी पूरग्रस्तांना गहू, तांदूळ पुरविले. यामुळे सोशल मीडिया हळवणकरांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. 

भाजप नेत्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी असाच पाठ गिरवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil troll by posting his own photos on the items sent to the flood victims