

जयंत पाटील यांनी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने आघाडीत नाराजीचे सूर उमटले आहेत.
esakal
Sangli Mahavikas Aghadi : धर्मवीर पाटील : नगरपालिका निवडणुकी पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून बाजी मारली असली, तरी राज्यस्तरावर घटकपक्षांची एकत्रित महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकीत एकत्र राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्राथमिक स्तरावर कोणतीही चर्चा न करता ‘आम्ही तुम्हाला जमेतच धरत नाही’ असा थेट संदेशच द्यायचा आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात असून, घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.