गिरीषपेक्षा त्याचा आई वडिलांचे अभिनंदन करणे जास्त श्रेयस्कर : डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ.गिरीश दिलीपराव बदोले यांचा विशेष सन्मान सोहळा आज बुधवार ता.२३ रोजी दुपारी अक्कलकोट येथील सी.बी. खेडगी महाविद्यालय सभागृहात डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रा.किसन झिपरे, महेश हिंडोळे, चंद्रकांत स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अक्कलकोट - केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ.गिरीश दिलीपराव बदोले यांचा विशेष सन्मान सोहळा आज बुधवार ता.२३ रोजी दुपारी अक्कलकोट येथील सी.बी. खेडगी महाविद्यालय सभागृहात डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रा.किसन झिपरे, महेश हिंडोळे, चंद्रकांत स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मूळचे कसगी ता.उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले आणि अक्कलकोट बाजार समिती सचिव मडिवाळप्पा बदोले यांचा गिरीश पुतण्या आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.परमेश्वर अरबळे यांनी केले तर गिरीष यांचा परिचय विद्याधर गुरव यांनी केला. संयोजन समितीच्या वतीने गिरीष यांना मानाचा फेटा, शाल आणि बुके देऊन महास्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. गिरीष म्हणाले की स्पर्धा परीक्षेची वाट जरी खडतर वाटत असली तर सातत्यपूर्ण प्रयत्नाने हमखास यश प्राप्ती होते. यासाठी श्रीमंत असणे किंवा इंग्रजी खूप चांगलेच असावे असे काही नाही. मी सुद्धा सामान्य शेतकरी कुटुंबातून आणि ग्रामीण भागातून वर आलेलो आहे. फक्त जिद्द आणि चिकाटी व प्रामाणिकपणा हा अत्यंत आवश्यक आहे. यापुढे जिल्हाधिकारी म्हणून उत्तम रितीने समाजसेवा करीत राहणार आहे. यासाठी अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहेत. 

डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की यशस्वी गिरीषपेक्षा त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन करणे जास्त महत्वाचे आहे. आता परीक्षेतील यश मिळाले पण यापुढे नोकरीच्या ठिकाणी आणि समाजसेवेत चांगले काम होऊन तिथे चांगली यशप्राप्ती मिळणे अधिक श्रेयस्कर ठरणार आहे. 

रोटरी क्लब ऑफ अक्कलकोट, लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट, व्यापारी महासंघ अक्कलकोट, के.एल.ई सोसायटीचे मंगरुळे हायस्कूल, अखिल भारतीय वीरशैव युवक शिवा संघटना अक्कलकोट, आडते व व्यापारी असोसिएशन अक्कलकोट, वीरशैव विश्व संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना, अक्कलकोट तालुका मुस्लिम समाज संघटना, 
खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे, अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक संघ,केंद्रप्रमुख संघटना आदी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने गिरीष यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे. या सत्कार सोहळ्यास गिरीष बदोले यांचे वडील दिलीपराव, आई शोभा तसेच वरील सर्व संस्थांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, मडिवाळप्पा बदोले, मल्लिनाथ साखरे, वीरभद्र यादवाड, दिनेश पटेल, सुधीर माळशेट्टी, गिरीष पट्टेद, रवी शहा, महाविद्यालय कर्मचारी वृन्द, गिरीषचे कसगी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार प्रा.आनंद गंदगे यांनी मानले.

Web Title: jaysiddheswar maharaj congratulate Dr. girish