रश्मी बागल यांना विरोधच! भाजपचे काम करणार : जयवंत जगताप

अण्णा काळे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या ते काॅग्रेसमध्ये आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत आपण भाजप बरोबरच रहणार असल्याचे ही त्यांनी 'सकाळ 'शी बोलताना सांगितले. जयवंतराव जगताप हे दोन वेळा आमदार होते.तर 29 वर्षे बाजार समितीचे सभापती होते.

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या ते काॅग्रेसमध्ये आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत आपण भाजप बरोबरच रहणार असल्याचे ही त्यांनी 'सकाळ 'शी बोलताना सांगितले. जयवंतराव जगताप हे दोन वेळा आमदार होते.तर 29 वर्षे बाजार समितीचे सभापती होते.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी बागल -जगताप असा टोकाचा संघर्ष पहायाला मिळाला. यावेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व प्रा.शिवाजी बंडगर यांना मारहाण झाली या प्रकरणात जयवंतराव जगताप हे संशयित आरोपी आहेत.या प्रकरणात त्यांना 9 महीन्यानी जामीन मिळाला.गेली 10 महीन्या नंतर पहील्यांदाच त्यांनी बागल यांच्याविषयी उघड भूमिका मांडली आहे. 

यावरून काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त असलेले जगताप आता विधानसभेच्या तोंडावर राजकारणात सक्रीय होऊ लागले आहेत. 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता जयवंतराव जगताप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत चार दिवसापुर्वी त्यांनी कराड येथे चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. 

भाजप-शिवसेना युती झाली तर आपण युतीच्या उमेदवाराचा प्रचार करू, मात्र जर करमाळ्यात शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली तर आपण बागल विरोधात काम करणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. रश्मी बागल यांनी स्वतःच्या व त्यांच्या वडिलांच्या राजकीय इतिहासाचे अवलोकन करावे.बागल गटाचा प्रवास शेकाप , जगताप गट, मोहिते -पाटील गट , भाजप -सेना पुरस्कृत , राष्ट्रवादी, काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी असा झाला आहे. प्रत्येक वेळी बागलांनी सोयीचे राजकारण केले असल्याचे सांगितले आहे. यावरून जगताप हे बागल यांच्या विरोधात भूमिका घेणार हे उघड झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaywant Jagtap oppose Rashmi bagal in assembly elections