जेसीबीने सहा वाहनास ठोकरले

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

या अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

सातारा - अदालत राजवाडा इथल्या उतारावर जेसीबीने सहा वाहनास ठोकरले. यामध्ये चार दुचाकी आणि उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहनाचा समावेश आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जेसीबी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. स्थानिक नगरसेवक अमोल मोहिते, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: JCB and six vehicles accident satara