शहरात डेंगीचा आणखी एक बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शहर आणि परिसरात डेंगीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. आज आणखी एक बळी गेला. शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनी परिसरातील जीवन दिनकर दीक्षित (वय ४९) यांचे आज खासगी रुग्णालयात निधन झाले. 

दोनच दिवसांपूर्वी त्यांना डेंगी झाल्याचे निदान झाले होते. विमला गोएंका स्कूलच्या शिक्षिका अनघा दीक्षित यांचे ते पती होत. रक्षाविसर्जन उद्या (बुधवारी) सकाळी आहे. 

डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी रुग्णालयातून दाखल आहेत. एकट्या शहरात गेल्या महिन्यात नऊशेवर, तर परिसरातील गावात साठहून अधिक रुग्ण होते. या महिन्यात आजअखेर तीनशेवर रुग्णांचा आकडा पोचला असून, ही आकडेवारी सरकारी आहे. प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयाबरोबरच अनेक खासगी रुग्णालयात नातेवाइकांना बसायलाही जागा नाही, असे चित्र आहे. 

काही घरात तर पती-पत्नी दोघांनाही तर घरातील सर्व लहान मुलांना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे. एकीकडे डेंगी जोरात पसरत असताना चिकनगुनिया आणि हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

Web Title: Jeevan Dixit Death by Dengue