चक्क... दागिन्यांत उतरला तिळगुळाचा गोडवा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

दरवर्षी हलव्याच्या दागिन्यांचे नानाविध प्रकार बाजारात येतात. यंदा तर तिळगुळांनी सजवलेले मोबाईल, लॅपटॉप बाजारात आले आहेत.मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरवातीलाच येणारा सण.

कोल्हापूर - एरवी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना मकर संक्रांतीच्या सणासाठी हलव्याचेच दागिने हवे असतात. संक्रांतीची खास काळी साडी आणि पांढऱ्याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर लेवून मिरवल्याशिवाय ‘संक्राती’चा सण साजराच होत नाही. दरवर्षी हलव्याच्या दागिन्यांचे नानाविध प्रकार बाजारात येतात. यंदा तर तिळगुळांनी सजवलेले मोबाईल, लॅपटॉप बाजारात आले आहेत.
मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरवातीलाच येणारा सण.

वाचा - बहिणीच्या नवऱ्याला किडनी देत जपलं तिच कुंकू....

या दिवशी घरात आलेल्या नव्या सुनेचं, जावयांचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. यामध्ये नानाविध व्हरायटी मिळत असून, यंदा खास जावयासाठी तर पारंपरिक दागिन्यांना आधुनिक टच देत दागिने बनविणाऱ्या कलाकरांनी नव्या डिझाईन्स समोर आणल्या आहेत. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. आकर्षक रंगसंगतीतील हे दागिने घालून या नव्या जोडप्याचे फोटोसेशन रंगते. या दागिन्यामध्ये काटेरी हलव्याची अंगठी, हलव्याचा गजरा, म्हाळसा हेअर पिन, बांगडी, पाटली, तोडे, मंगळसुत्र, बाजुबंद, तोडे, मोराची नथ असे दागिने बाजारात आहेत. गळ्यातील हार, कर्णभुषणे, कंबरपट्टा, किरीट असे दागिने घालून बाळगोपाळही नटणार आहेत. हे दागिने ५०० रुपयांपासून अडीच - तीन हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध 
आहेत. 

जावयासाठी एकपदरी राणीहार, नवविवाहितेसाठी मोर, कोयलीचे डिझाईन्स असलेल्या छल्ला, मेकला, कुंटनमध्ये असलेले मंगळसूत्र अशा दागिन्यांची क्रेझ आहे.
- संगीता सावर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelery adorned with tilgul has come on the market kolhapur marathi news

टॉपिकस