
Sangli Politics : रवींद्र माने : सावळज जिल्हा परिषद गट १९७८ पासून आर. आर. आबा गटाचा बालेकिल्ला आहे. येथूनच दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्याच्या राजकारणापर्यंत धडक मारली. या गटातून आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. यावेळी काय घडणार, याचे आखाडे बांधले जात असले तरी लढतीचे स्वरूप आरक्षण निश्चित झाल्यानंतरच ठरेल.