नोकरी ‘सहा’ तासांचीच करावी - अनिल बोकील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सांगली - भारतीय लोक ज्या वातावरणात राहतात, तेथे तीन ते साडेतीन तासच काम करू शकतात. आठ तास कामाची सक्ती केली जाते. त्याऐवजी नोकरीचे तास सहा करावेत आणि डबल शिफ्टमध्ये काम करावे. त्याने नोकऱ्या वाढतील, उत्पादकता वाढेल आणि देशाचा विकासदरही वाढू शकेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी येथे व्यक्त केले. 

सांगली - भारतीय लोक ज्या वातावरणात राहतात, तेथे तीन ते साडेतीन तासच काम करू शकतात. आठ तास कामाची सक्ती केली जाते. त्याऐवजी नोकरीचे तास सहा करावेत आणि डबल शिफ्टमध्ये काम करावे. त्याने नोकऱ्या वाढतील, उत्पादकता वाढेल आणि देशाचा विकासदरही वाढू शकेल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी येथे व्यक्त केले. 

सांगली जिल्हा रोटरी परिवारातर्फे विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या ‘अर्थक्रांती व भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. ‘रोटरी’चे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी, सचिव डॉ. मोहन पाटील आदी व्यासपीठावर होते. स्मिता कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. अशोक सावंत, किरण तारळेकर, रवीकिरण कुलकर्णी यांच्या हस्ते स्वागत झाले. 

ते म्हणाले, ‘‘आठ तासांच्या ड्यूटीत तीन तास काम करून लोक उर्वरित वेळेत टाईमपास करतात. त्यांना बांधून ठेवल्यासारखे वाटते. मानसिक, शारीरिक त्रास होतो. व्याधी जडतात. या परिस्थितीत सहा तासांचे ऑफिस टाईम करावे. डबल ड्यूटी करावे. माणूस आनंदाने जगू शकेल. चांगला वेळ कुटुंबात घालवता येईल. देशाचे उत्पन्नही वाढू शकेल, अशी आमची शिफारस आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पैसा हे विनिमयाचे माध्यम न राहता ती वस्तू झाली. ती साठवली गेली. त्यामुळे देशासमोरील प्रश्‍नांची जंत्री मोठी झाली. ती देहव्यापारापासून ते शत्रूराष्ट्रांसाठी देशात खळबळ माजविण्याइतपत गंभीर होती. या स्थितीत नोटाबंदीचा निर्णय घेणे गरजेचे होते आणि त्याने आपली अर्थव्यवस्था प्रवाही झाली. अर्थात, आपली एकूण व्यवस्था ही उपयुक्ततेपेक्षा ‘परवडणारे’ या शब्दाभोवती फिरतेय, ही मोठी समस्या असल्याने ती आधी बदलावी लागेल.’’

ते म्हणाले, ‘‘जगाची भाषा बदलली आहे. पैसा हीच भाषा झालीय. आपल्याकडे २० टक्के लोकांकडे प्रचंड पैशांचा संचय आहे आणि ८० टक्के लोक साधनं शोधण्यासाठी झगडत आहेत. पर्यावरणाशी जगातील अर्थकारण निगडीत होतं, त्यात नोटा पर्यावरणाशी तुटल्या होत्या. पैसा वस्तू झाली. प्रवाहीपणा थांबला. सार्वजनिक मालमत्ता खासगी व्हायला लागली. पैशांच्या पाऊलखुणा दिसेना झाल्या. अशावेळी नोटबंदी करणे गरजेचेच होते. त्याने सारे प्रश्‍न सुटलेले नसले तरी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.’’

Web Title: The job should be done only for six hours