कऱ्हाडमध्ये आमदार कदमांच्या प्रतिमेला 'जोडोमारो'

कऱ्हाडमध्ये आमदार कदमांच्या प्रतिमेला 'जोडोमारो'

कऱ्हाड : तरुणी आणि महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज येथे निदर्शने करून आमदार कदम यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन केले. यावेळी महिलांनी आमदार कदम यांच्या निषेधाच्या जोरादार घोषणा दिल्या. 

येथील चावडी चौकात शिवसेनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले. आमदार कदम घाटकोपर येथे दहीहंडी कार्यक्रमात युवती व महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. राज्यात त्यासंदर्भात आमदार कदम यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर आज येथे शिवसेनेने आंदोलन केले. आमदार कदम यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांच्य हातात आमदार कदम यांच्या निषेधाचे व त्याचे छायाचित्र असलेले फलक होते. महिलांनी या फलकावरील छायाचित्राला जोडोमारो आंदोलन केले. शिवेसनेचे उप जिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हापसे यांनी भाषण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com