जोतिबा डोंगर परिसराची आयुक्‍तांनी केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

कोल्हापूर - यमाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण व पार्किंग स्थळ करावे, सेंट्रल प्लाझाच्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी उपाय सुचवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज केल्या. 

जोतिबा विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीनुसार आठ ठिकाणी प्रत्यक्ष कामे सुरू केली जाणार आहेत. दरम्यान यामध्ये आणखी काही बदल करता येतो का, हे पाहण्यासाठी श्री. दळवी यांनी जोतिबा डोंगरला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

श्री. दळवी म्हणाले, ‘‘जोतिबा डोंगर विकास आराखड्यांतर्गत मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबत शासन निर्णय घेऊन या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्प आराखड्यातील प्रस्तावित तरतुदीबाबत आज डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आराखड्यानुसार आठ प्रकारची कामे केली जातील. शासनाला आराखडा पाठविला त्यावेळी केवळ ब्लॉक इस्टिमेट पाठविली जाते. त्यानंतर त्याचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार केले जाते.

दरम्यान २५ कोटी रुपयांचा निधीचा शासन निर्णय जाहीर होईपर्यंत प्रस्तावित आठ कामांमध्ये आणखी काही वेगळी कामे करता येतात का, याचा आढावा घेतला. तसेच त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आराखड्यात काही बदल असल्यास स्थानिक समितीने बदल सुचवावा. हा बदल का गरजेचा आहे, तो कसा करता येईल, याची माहिती दिल्यास आराखडा राबविण्यास सोयीचे ठरेल.’’ 

जोतिबा डोंगरावर यमाईकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. या ठिकाणी सुशोभीकरण करता येऊ शकते तसेच पार्किंगचीही व्यवस्था करता येईल. याच पार्श्‍वभूमीवर बैठकही घेतली. जोतिबा सेंट्रल प्लाझा प्रस्तावित आहे. सेंट्रल प्लाझाच्या सुरक्षेबाबत विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्वत: जाऊन आराखड्यात बदल सुचविण्याचे दळवी यांनी निर्देश दिले. 

अस्वच्छतेचे साम्राज्य  
जोतिबा डोंगरावर अस्वच्छता आहे. प्रत्येक रविवारी दोन लाख भाविक डोंगरावर येतात. देवस्थान समितीने मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी आऊट सोर्सिंग करून काम दिले पाहिजे. नियमित स्वच्छतेचे कामकाज पंधरा दिवसांच्या आत झाले पाहिजे, अशा सूचनाही दळवी यांनी केल्या.

Web Title: jotiba dongar area watching by commissioner