ज्वारी, गव्हाची नासाडी

अतुल वाघ 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

वाठार स्टेशन - परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके जोमात असली तरी रानडुकरांच्या उपद्रवाने या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

वाठार स्टेशन - परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके जोमात असली तरी रानडुकरांच्या उपद्रवाने या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

वाठार स्टेशन परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीबरोबर सर्वच पिके जोमात आहेत. यावर्षी पाऊसमान कमी असल्यामुळे पाणीसाठा झाला नसला तरी 

सहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसाने येथील पिकांना जीवदान भेटले असून त्यामुळे महत्त्वाचा जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. या भागातील जाधववाडी, फडतरवाडी, विखळे, नलवडेवाडी, बिचुकले, तळिये ही गावे डोंगरालगत असून, या डोंगर परिसरात वन विभागाने मोठ्या प्रमाणात झाडांची लागण केल्याने सध्या चांगलेच जंगल झालेले दिसून येत आहे. त्यामुळे फायदा नक्कीच होत असला तरी दुसऱ्या बाजूला या झाडीमुळे या डोंगर भागात जंगली प्राण्यांचे प्रमाण वाढलेले असून, त्यामध्ये रानडुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.  ही रानडुकरे दिवसभर डोंगरात राहत असली तरी सायंकाळच्या वेळेला ती येथील शिवारात येऊन ज्वारी, ऊस, मका यांसारख्या पिकांची नासाडी करत आहेत. शेतकरी आपल्या परीने पिकांच्या सुरक्षेकरता शेताभोवती तारेचे कुंपण करतात. मात्र, ही रानडुकरे कुंपण तोडून शेतात जात असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ज्वारी हे पीक शेतकऱ्यांना वर्षभर खाण्यासाठी व जनावरांना वर्षभर चाऱ्यासाठी महत्त्वाचे असून, भविष्यात चाराटंचाई होण्याची दाट शक्‍यता आहे. वन विभागाने या परिसरातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी या बाबत वन विभागाशी संपर्क साधून पिकांची नासाडी झाल्याबाबत अर्ज करावेत. आम्ही त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करू.
- सी. एच. जगदाळे, वनपाल, वाठार स्टेशन

Web Title: Jowar wheat damage