esakal | भारीच... जुळे सोलापूकरांनी मानले 'सकाळ'चे आभार
sakal

बोलून बातमी शोधा

भारीच... जुळे सोलापूकरांनी मानले 'सकाळ'चे आभार

'सकाळ'ने सातत्याने आवाज उठवला 
जुळे सोलापुरातील नागरिकांच्या समस्यांवर 'सकाळ'ने सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे साईश्री बंगलोज्‌, कित्तुर चनम्मा नगर, अनुपम पार्क व नरेंद्र नगरातील कच्चे रस्त्यांवर डांबीरकरण करण्यात आले आहे. तर सिध्देश्‍वर नगर व सिध्दीविनायक नगरातील कामेही प्रगतीपथावर आहेत. 
- संजीव समन, रहिवाशी, जुळे सोलापूर 

भारीच... जुळे सोलापूकरांनी मानले 'सकाळ'चे आभार

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जुळे सोलापुरचा हद्दवाढ भाग सोलापूर महापालिका क्षेत्रात येऊन आता 20 वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र, नागरिकांसाठी पक्‍के रस्तेही करण्यात आले नव्हते. अर्धवट ड्रेनेज लाईन, पथ दिवे नसल्याने परिसरात भितीदायक वातावरण होते. गेली वर्षभर 'सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली होती. परिणामी साईश्री बंगलोज्‌, कित्तुर चनम्मा नगर, अनुपम पार्क, नरेंद्र नगरातील कच्च्या रस्त्यांचे डांबीरकरण करण्यात आले आहेत. येथील नागरिकांनी 'सकाळ'चे आभार मानले. 

हेही वाचा : राष्ट्रवादीला बाजूला ठेवत शेकारचे आता एकला चलो रे 

सोलापूर शहराच्या तुलनेत आता जुळे सोलापुरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. याठिकाणी व्यवसाय, शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र, 15 वर्षांपूर्वी येथील नागरिनकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून चार इंची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. कुटुंबांची संख्या वाढल्याने नागरिकांना मुबलक प्रमाणात प्यायला पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. अर्धवट जोडणी केलेली ड्रेनेज लाईन तर काही नगरात ड्रेनेज लाईनच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सकाळ'ने पुढाकार घेतला असून आमच्या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचे काम केले जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्‍त केल्या. 

हेही वाचा : सोलापूर युवक कॉंग्रेसने केला हा गनिमी कावा 

आमदार सुभाष देशमुखांचे महापालिकेस पत्र 
जुळे सोलापुरातील सुभाष नगरात 'सकाळ'च्या वतीने नागरिकांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांनी समस्या कथन केल्या. या पार्श्‍वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्‍तांना कामे मार्गी लावण्याबाबत पत्र दिले आहे. अर्धवट ड्रेनेज लाईन असल्याने सांडपाणी येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा परिसर उतारावर असल्याने सगळीकडून येणारी पाणी साठून राहते. त्यामुळे सापांसारख्या विषारी प्राण्यांची भिती निर्माण होत असते. डांसाचे प्रमाण वाढून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. या परिसरातील लोकवस्ती वाढल्याने अधिक दाबाने पाणी पुरवठा करणे, तसेच अंतर्गत पाणी पुरवठ्याची लाईन सर्व नगरात टाकण्याची गरज आहे. पथदिवे नसल्याने परिसरात खूपच अंधार असतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावावेत, असे पत्र आमदार सुभाष देशमुख यांनी दिले आहे.

loading image
go to top