सोलापूर युवक कॅंाग्रेसने केला हा गनिमी कावा (VIDEO)

सोलापूर युवक कॅंाग्रेसने केला हा गनिमी कावा (VIDEO)
Updated on


सोलापूर : कोणाचाही पुतळा जाळण्यास पोलिस प्रशासन परवानगी देणार नाही याचा अनुभव घेतलेल्या सोलापूर युवक कॅंाग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
शुक्रवारी गनिमी कावा खेळत आपला हेतू साध्य केला. आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश न होण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांचा पुतळा जाळून
त्यांनी निषेध व्यक्त केला. 

खर्गे यांच्या पुतळ्याचे केले दहन
आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडी मंत्रीमंडळामध्ये  स्थान मिळाले नाही. त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक  पार्क येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळण्यात आला. आमदार शिंदे यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश न होण्यामागे केवळ आणि केवळ खर्गे यांचा हात असल्याचे मत यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले व हीच भावना सर्वांची असल्याने खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले 

कॅंाग्रेस वाचविण्यासाठी खर्गेंना हटवा
कार्यकर्त्यानी सोनिया गांधी, राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे म्हणत खर्गे हटाव काँग्रेस बचाव असे जोरजोरात घोषणा दिल्या. त्यावेळी चार हुतात्मा पुतळा परिसर दणाणून गेला होता. सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, राजासाब शेख, संतोष अट्टेलूर, विवेक इंगळे, प्रवीण जाधव, राहुल गोयल, शाहू सलगर, अनिल मस्के, यल्लप्पा तुपदोळकर, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, सैफन शेख, आप्पाजी गायकवाड, यांच्यासह कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रीपदावरून वाद, कॅंाग्रेसमध्ये गटबाजीची शक्यता
आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील कॅंाग्रेसप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र त्याचवेळी कॅंाग्रेसमध्ये दोन गट पडले असून, त्याचा फटका कॅंाग्रेसला बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात प्रणिती शिंदे यांचा  समावेश नक्की असल्याची खात्री सर्वांनाच होती. मात्र त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे सर्वांचाच अपेक्षाभंग झाला. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी  याचा निषेध म्हणून सर्वात आधी नगरसेवकपदाचा शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, त्यानंतर इतर पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले. मात्र राजीनामे देण्यावरून कॅंाग्रेसमध्ये दोन गट पडले. त्याचा फटका भविष्यात कॅंाग्रेसला बसू शकतो.

सुशीलकुमारांची भूमिका ठरणार महत्त्वाची
राजीनामे द्यावेत की नाही याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. राजीनामे दिल्यास पक्ष अडचणीत येईल, त्यापेक्षा पदाधिकाऱ्यांना भेटू, प्रसंगी दिल्ली गाठू आणि श्रेष्ठींमार्फत मंत्रीपद आणू असे काहीजणांचे मत आहे. तर राजीनामे दिल्याशिवाय श्रेष्ठी दखल घेणार नाहीत, त्यामुळे शहराध्यक्ष, महिला आघाडी  पदाधिकारी व नगरसेवकांनीही त्यांचे राजीनामे द्यावेत. नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे न देता ते महापालिका आयुक्तांकडे द्यावेत, अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. गुरुवारी पु्न्हा आंदोलन करण्यात आले व पुतळे जाळण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणामुळे कॅंाग्रेसची जनमाणसातील प्रतिमा मलिन होऊ शकते, त्यामुळे या  प्रकरणात सुशीलकुमार शिंदे आणि आमदार शिंदे यांची भूमिका काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आता पाहूया पुतळा दहन (VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com