
कडेगाव : पूर्वेकडील राज्य मणिपूरमधून उड्डाण केलेला व सॅटेलाईट टॅग लावलेला अमूर ससाणा पक्षी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे थांबला आणि गुहागरमधील गोपाळगडावरून अरबी समुद्रात प्रवेश करून त्याने केनियापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. १३ ते २७ नोव्हेंबर या १५ दिवसांत या पक्ष्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. त्याच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.