अटकेपार झेंडा फडकवेल का आबासाहेब? 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

आंतराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकावण्यासाठी आबा आता सज्ज झाला आहे. आबाच्या या निवडीमुळे शेगाव दुमाला ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत. 

रोपळे बुद्रूक (जि. सोलापूर) ः शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील महाराष्ट्राचा पैलवान आबासाहेब बजरंग आटकळे याची इराणमध्ये होणाऱ्या आंतराष्ट्रीय कुस्ती चषक स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकावण्यासाठी आबा आता सज्ज झाला आहे. आबाच्या या निवडीमुळे शेगाव दुमाला ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा - पत्नीला धक्का.... एका चिठ्ठीने उलगडले नवऱयाचे पूर्वआयुष्य

इराणमधील बोजनुर्द शहरात 18 ते 20 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय कुस्ती चषक स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी भारतीय संघातून आबाची 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात निवड झाली आहे. जालंदर (पंजाब) येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आबाने 57 किलो वजनी गटात नुकतेच रौप्यपदक मिळवले आहे. शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसुध्दा रौप्यपदक मिळवले होते. पुणे येथील आंतराष्ट्रीय क्रीडा संकुलचे वस्ताद अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. 

हेही वाचा - अबब.. 350 चे खताचे पोते 1200 रुपयांना काय आहे हा प्रकार

कुस्तीची परंपरा आमच्या घरात आहे. परंतू या क्षेत्रातील सर्व आवाहने पेलत कुस्तीतच करियर करायचे ठरवले आहे. इराणमध्ये होणाऱ्या आंतराष्ट्रीय कुस्ती चषक स्पर्धेसाठी माझी निवड झाल्याचा आनंद वाटतो आहे. 
- पै. आबासाहेब आकळे, शेगाव दुमाला,ता.पंढरपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junior wrestling competition in iran