पीडितेला लवकरच मिळणार, "सखी'चा आधार! 

अशोक मुरुमकर
गुरुवार, 7 जून 2018

सोलापूर : पीडित व अत्याचारग्रस्त महिलांच्या मदतीसाठी लवकरच "सखी' धावून येणार आहे. एखाद्या महिलेवर अत्याचार किंवा छळ झाल्यानंतर तिला तत्काळ मदत हवी असती. परंतु अनेकदा ती वेळेत मिळत नाही. त्यामुळे तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून वन स्टॉप सेंटर "सखी' सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये पीडितेला आधार देण्यासाठी एकाच ठिकाणी पोलिस, वकील, डॉक्‍टर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून महिला व बालविकास विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यांमधील महिला व बालविकास विभाग सेंटर सुरू करण्यासाठी जागा शोधत आहेत. काही ठिकाणी जागाही उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच त्याची कामे सुरू होतील असे सांगितले जात आहे. खासगी, सार्वजनिक ठिकाणी, कौटुंबिक, कामाच्या व इतर ठिकाणी अनेकदा महिलांचा मानसिक व शारीरिक छळ होतो. याबरोबर अत्याचार झालेल्या पीडित महिलांना योग्य ती तत्काळ मदत हवी असते. मात्र अनेकदा ती मिळण्यास विलंब होतो. त्याचा त्रास तिला सहन करावा लागतो. "सखी'मध्ये पोलिस, वकील, डॉक्‍टर, निवारा व समुपदेशक या सर्व सुविधा एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 

रूपाभवानी परिसरात जागा 
सोलापुरात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने येथील रूपाभवानी परिसरातील जागा सुचवली आहे. तसा प्रस्तावही महापालिकेला दिला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी 40 लाखांचा निधीही तयार आहे. जागेला मान्यता भेटल्याबरोबर तसा प्रस्ताव पाठवला जाणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी सांगितले.

Web Title: justice to lady victim sakhi scheme supports