बिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भावूक...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

सांगली: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज (सोमवार) माघार घेतल्यानंतर पाठोपाठ अन्य आठ जणांनी तोच कित्ता गिरवला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी ऍड गणपतराव पाटील, सतीश पाटील, मोहन राऊत, अभिजित आवाडे-बिचुकले, बजरंग पाटील, मिलिंद कांबळे, विलास कदम अशा अन्य आठ उमेदवारी अर्ज मागे घेतले. बिनविरोध निवडीनंतर विश्‍वजीत कदम झाले भाऊक झाले.

भाजपच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चुरस होईल असे वाटत होते. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप, देशमुख यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले खासदार संजय पाटील अशी मात्तबर मंडळी संग्रामसिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. तथापि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यानी कडेपूर येथे आज पत्रकार परिषद घेऊन माघारीचा निर्णय जाहीर केला.

विना अट माघार
"पतंगराव कदम राज्याचे ज्येष्ठ नेते होते. आजवर एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय वारसाबाबत सर्वच पक्षांनी सहानभूती दाखवून माघार घेतली आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे. त्यानुसार आम्ही कोणतीही अट किंवा शर्थ न घालता या निवडणुकीतून माघार घेतली आहे.''
- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

"पक्षाच्या आदेशानुसार आम्ही माघार घेतली आहे. त्यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणूक लढवली असली तरी आम्ही तसे करणार नाही. आम्ही सुसंस्कृत कुटुंबातून आलो आहोत.''
- संग्रामसिंह देशमुख

Web Title: kadegaon bypoll vishwajeet kadam tears of joy