
कडेगाव : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून या महिनाअखेर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचे धुराडे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस कारखान्याला गळितास पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. याचा गैरफायदा घेऊन ऊसतोडणी मजूर व यंत्रचालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.