... तर कडेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट होईल

Kadegaon taluka will be the hotspot of Corona
Kadegaon taluka will be the hotspot of Corona

कडेगाव (जि. सांगली) : मुंबईसह व परराज्यातील कनेक्‍शनमुळे तालुक्‍यात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुक्त असलेल्या तालुक्‍यात बघता बघता कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली. तर एका कोरोना बधिताचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. तेव्हा नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वयंशिस्त व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कडेगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट व्हायला वेळ लागणार नाही. 

जगभरात कोरोना हातपाय पसरत होता. मात्र येथील नागरिकांनी पाळलेली स्वयंशिस्त, आरोग्य विभाग, तालुका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी केलेल्या उपाययोजना यामुळे गेल्या महिन्यापूर्वी तालुक्‍यातील एकाही गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. मात्र परराज्यासह, मुंबई, पुणे व आदी हाय रिस्क झोनमधून जिल्ह्यात सुमारे 13 हजारांवर लोक परवाना घेऊन व विना परवाना तालुक्‍यात दाखल झाले आहेत. तर बाहेरून आलेले लोकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.

त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सध्या तालुक्‍यातील भिकवडी खुर्द येथे पाच, सोहोली येथे दोन, आंबेगाव येथे एक, खेराडेवांगी येथे एक असे एकूण नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर भिकवडी खुर्द येथे आढळलेल्या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 

तर सध्या लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे भिकवडी खुर्द, सोहोली, आंबेगाव, खेराडे वांगी आदी कोरोनाचे रुग्ण आढळलेली गावे वगळता कडेगावसह इतर सर्व गावांतील बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली आहेत. तेथे नागरिक काही अपवाद वगळता कसलीही स्वयंशिस्त पाळताना आढळत नाहीत. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाला आहे. 

प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे, डॉ. माधव ठाकूर, पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस आदी प्रशासनातील रियल हिरो आपल्या जीवाचे रान करून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. 

आकडे बोलतात 

  • एकूण कोरोना रुग्ण संख्या.....9 
  • उपचार घेणारे रुग्ण..............8 
  • बरे झालेले रुग्ण..................0 
  • मृत्यू...........&..&...............1 
  • बाहेरून आलेल्यांची संख्या...13,078 
  • परदेशातून आलेल्यांची संख्या...21 
  • होम क्वारंटाईन संख्या.....2,475 
  • संस्थात्मक क्वारंटाईन संख्या...26 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com