
-संतोष कणसे
कडेगाव : दीडशे वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त आज गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा झाला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सोहळ्याला राज्यासह कर्नाटक सीमाभागातून सुमारे लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावली. अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’ असा एकच जयघोष केला.